prabodhini news logo
Home चंद्रपूर अवयवदान, देहदान पर्यावरण हिताय ठरते – श्रीराम पान्हेरकर

अवयवदान, देहदान पर्यावरण हिताय ठरते – श्रीराम पान्हेरकर

0
105

प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी, चंद्रपूर – मानवी अवयव व शरीर अमूल्य असून मरणोत्तर ही त्याचा राष्ट्रहितार्थ उपयोग होतो त्यामुळे नागरिकांनी जिवंत असताना समाजभान राखायांचे असते तसेच मरणोप्रांत ही अवयव दान, नेत्रदान व देहदान हे राष्ट्रपयोगी कार्य असून पर्यावरण हितार्थ उपयुक्त ठरेल असे मौलीक मार्गदर्शन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर ह्यांनी स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघ निर्माणनगर तुकूम चंद्रपूर येथील जेष्ठ नागरिक सभागृहात जेष्ठ नागरिकांसोबत व्यासपीठावरून केले.
सर्वप्रथम वृद्ध महिलांनी जेष्ठ नागरिकांना ओवाळून रक्षाबंधन केले तसेच परिसरातील गुणवन्त विध्यार्थ्यांचा रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर जेष्ठ नागरिक धर्मपुरीवार. ददगाल, भोलाराम सोनुले डॉ. वनकर विराजमान होते.
ह्याप्रसंगी सोनचाफा वृक्ष भेट वृक्षारोपण करण्यासाठी विकलांग सेवा संस्थेच्या वतीने देण्यात आली.सामूहिक गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here