prabodhini news logo
Home झरी येडशी ते मुकूटबन या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था

येडशी ते मुकूटबन या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था

0
140

रस्त्याने जात असताना येते समृध्दी महामार्गाची आठवण

संघर्ष भगत झरी जामनी प्रतिनिधी – झरी जामनी तालुक्यातील येडशी ते मुकुटबन या मार्गाची अतिशय पावसाने दयनीय अवस्था केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.कारणही तसेच आहे. सद्या पावसाळा सुरू झाला असून या मार्गाने कित्तेक गावातील नागरिक व शाळकरी विद्यार्थी ऑटो ने ये-जा करतात मात्र रस्त्याने चीखलच चिखल झाल्याने वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.आजुन पर्यंत कोणतेच पदाधिकारी या मार्गाने फिरकुन सुद्धा पाहले नाही.आज कसा बसा जीव वाचवून प्रवास करावा लागत आहे.उद्या जर कोणाला काही झाले आणि जीवितहानी घडली तर नेमक दोषी कोणाला ठरवणार हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.येडशी ते मुकुटबन सहा किलोमीटर आहे.मात्र कंपनी पासून येडशी कडे जात असताना जणू आपण नॅशनल हायवे ने जात आहों की काय असं बाईक स्वारांना वाटते.असा येडशी ते मुकूटबन येथील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सद्या शेतकऱ्याने अतिक्रमण केल्याने जणू पाच फुटाचा रस्ता बनला आहे.समोरून वाहन आले तर पर्यायच संपून जाते. संबधित विभागाने व सत्तेतील आमदार साहेबाने या कडे लक्ष देऊन काही तरी तोडगा काढून विल्हेवाट लावावी अशी मागणी येडशी गावकरी करताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here