
मारहाण प्रकरणी तिन सदस्यीय चौकशी समिती गठित लवकरच होणार कायदेशीर कारवाई…
लातूर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे काल दिनांक 12 ऑगस्ट रोजी प्रस्तुतीसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या पतीला महाराष्ट्र सुरक्षा बल च्या सुरक्षारक्षकांनी गेटवरच अडवून बेदम मारहाण केल्याप्रकरणी भिम आर्मी तसेच विविध सामाजिक संघटना व पक्ष पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाचे अधिष्ठाता उदय मोहिते यांची आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता भेट घेऊन सदर प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. त्यांना सेवेतून कमी करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
या मारहाणीचे पडसाद जिल्ह्यात जोरात उमटले असून सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स अर्थात महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्याकडे रुग्णांना व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम आहे पण त्यांचे भलतेच काम सुरू असल्याने संतप्त झालेल्या भिम आर्मी आणी विविध सामाजिक संघटना व पक्ष पदाधिकारी यांनी हे निवेदन दिले आहे तर दोषीवर कारवाई न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा यावेळी भिम आर्मी विनोद कोल्हे, भिम आर्मी जिल्हाप्रमुख विलास चक्रे श्री.सुनील बसपुरे महानगर प्रमुख शिवसेना उबाठा, श्री.अविराजे निंबाळकर सं.अध्यक्ष. महाराष्ट्र आर्यन सेना सामाजिक संघटना, श्री.महादूभाऊ रसाळ अध्यक्ष लोकनायक सामाजिक संघटना, रावण साम्राज्य संघटना, ब्ल्यू पॅंथर संघटना, वास्ट मीडिया शामल माळी मॅडम शहिद अहेमद खान पठाण कृती समिती,भिम आर्मी जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे, भिम आर्मी जिल्हासंघटक सोनू घोडके, भिम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे, मारुती कावळे यांनी दिला आहे.
दरम्यान रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहिते यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे समितीला सांगितले आहे. निष्पन्न होणाऱ्या या अहवालात दोषीवर तात्काळ कारवाई केली जाणार असून त्याचा अहवाल पोलीस प्रशासनाला पाठवण्यात येणार आहे असे यावेळी अधिष्ठाता मोहिते यांनी सांगितले.















