prabodhini news logo
Home गडचिरोली सिरोंचा येथे ओपन जिमखानाचे उदघाटन

सिरोंचा येथे ओपन जिमखानाचे उदघाटन

0
178

सिरोंचा प्रतिंनिधी – कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सिरोंचा येथे दिनांक 13/8/2025 रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय गडचिरोली अंतर्गत मंजूर झालेले ओपन जिमखाना याचे उदघाटन माननीय लता चौधरी (उपशिक्षणाधिकारी समग्र शिक्षा अभियान गडचिरोली) यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सदर उद्घाटन प्रसंगी के.के.चव्हाण (शिक्षण विस्तार अधिकारी गटसाधन केंद्र) सिरोंचा सोमनपल्ली (केंद्रप्रमुख) सिरोंचा, श्रीरंगी (मुख्याध्यापक) मॉडेल शाळा, भोयर (साधन व्यक्ती) यांच्या विशेष उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम पार पाडण्यात आले सदर प्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. एम साखरे यांनी केले व उपस्थित सर्व मान्यवर यांनी विद्यार्थिनी सोबत हितगुज साधून विद्यार्थ्यांना व्यायाम योगासन यावर मार्गदर्शन केले आणि ओपन जिमखानाचा पुरेपूर वापर करून आपण तंदुरुस्त राहून ज्ञानार्जन करावे असे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here