
प्रशांत सरांनी उजळून शब्ददिप
वाढविला आमचा ज्ञानसाठा
प्रबोधिनी साहित्य मंचातून
दाखविल्या अस्तित्वाच्या वाटा(१)
संस्काराचा अनमोल झरा
वाहे तुमच्या कार्यातून
प्रेरणेचे आधारस्तंभ
आदर्श घ्यावे तुमच्याकडून(२)
संकल्प निश्चय परिश्रम
हे तुमच्यातील गुण
दिली ओळख आम्हाला
कसे फेडावे हे ऋण(३)
साहित्यिकांच्या डोळ्यात तुम्ही
स्वप्नांची ज्योत जागविली
शब्द ज्ञानाचा महान मार्ग
नवी आस दाखविली(४)
अभिष्टचिंतन वाढदिवशी
पूर्ण व्हावी मनोकामना
आरोग्य आनंद यश लाभो
अशी ईश्वरचरणी प्रार्थना(५)
डॉ.स्मिता गजभिये
लाखनी,जिल्हा.भंडारा















