Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता –...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता – अभिष्टचिंतन 

0
131

आदरणीय प्रशांत रामटेके सर
वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा
करा साहित्याची पादाक्रांत शिखरे
होउदे पूर्ण तुमच्या मनातील इच्छा

भारताच्या स्वातंत्र्य दिनी
जन्म घेतला जरी भूवरी
समाजकारण राजकारण
भाग्य रेखिले भाळावरी

आठ पुरस्कारांनी सन्मानित
तुम्ही पत्रकारिता जोपासली
गोरगरिबांच्या न्यायासाठी
लेखणी तुमची चालविली

तडफदार नेतृत्व आपले
प्रबोधन करण्यास सिद्ध झाले
प्रबोधिनी मंचाचे संपादक होऊनी
नव साहित्यिकांना मार्गदर्शन केले

प्रबोधिनी न्यूज ची व्हावी उदंड किर्ती
प्रत्येक रविवारची आम्ही वाट पाहतो
छापलेले लेख कविता वाचताना
स्व किर्तीने जीव सुखावतो

तुमच्या महान कार्यामुळेच लाभला
ग्लोबल फाउंडेशन चा पुरस्कार
मराठी भाषेच्या संवर्धनाला
तुमचा जिव्हाळ्याचा हातभार

सौ.वंदना शशिकांत पाटील 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here