
कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची येथील शाळेच्या पटांगणात भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन सोहळा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरालाल ऊईके यांच्या अध्यक्षतेखाली भर पावसात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
शाळेतील क्रीडा शिक्षक अमित मेश्राम यांनी शाळेचे मुख्याध्यापक मा. उमाकांत ढोक यांना मानवंदना देऊन मुख्याध्यापक यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षण, आरोग्य व विद्यार्थांच्या सुखसुविधा विषयी आढावा घेण्यात आला. तसेच मातापालक आणि शिक्षक पालक संघाची स्थापन करण्यात आल. याकरिता परिसरातील बहुसंख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी शाळेतील परेश मेश्राम,प्रमोद शंभरकर, मनोज गजभिये, हरेश कामडी,अरुण कायंदे,अभिमन्यू वाटगुरे,राहुल अंधारे,जेष्ठ शिक्षक भैयालाल कुरसंगे, गुरुराज मेंढे,कुणाल गोवर्धन, संतोष सहारे,अमित मेश्राम, डाकराम ठाकरे, गीता राऊत, सुषमा अंबोणे,मनोज आचार्य, प्रीती खंडाते,नैना, सिमा कुरेकार अधिक्षिका,दुबे अधिक्षक, आरोग्य सेविका विद्या कोवे, चरण,राहुल दिघोरे आदी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.















