
वणी (जि. यवतमाळ) :
ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ऑगस्ट रोजी वणी येथील खंडोबा- देवस्थान सभागृहात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
“OBC (VJ, NT, SBC) च्या उज्वल भविष्यासाठी जातनिहाय जनगणना आजची गरज” हा या स्पर्धेचा विषय होता. प्रभावी विचार मांडत प्रेम नामदेव जरपोतवार (चंद्रपूर) याने प्रथम क्रमांक पटकावला.
विजेत्याला ३ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. प्रभावी वक्तृत्व, तर्कशुद्ध मांडणी आणि अभ्यासपूर्ण विचारसरणीच्या जोरावर प्रेम जरपोतवारने यश संपादन केले.















