
नवनाथ उल्हारे 7744022677
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हर घर तिरंगा कार्यक्रम अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाला.तिरंगा आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतिक आहे. तिरंगा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ ही मोहीम राबविण्यात आली होती. लोकांच्या हृदयात देशभक्ती जागृत करणे, आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढविणे हा ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे असे विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे ए. आर. यांनी सांगितले.
१५ ऑगस्ट या दिवशी ७९वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ढोल ताशांच्या गजरात व लेझीम पथकासह गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. वंदे मातरम. भारत माता की जय. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो या घोषणा देत असमंत उजळून निघाला. या ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण मा. अशोकराव जनार्दन आहेर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी विद्यालयाचे थोर देणगीदार उद्योजक नवी मुंबई प्रकाशभाऊ तिडके यांनी स्वातंत्र्याचे तसेच घरोघरी तिरंगा याबाबत महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीचे भान करून दिले. विद्यालयातील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांनी एक लाख रुपये देणगी दिली. मा. सोमनाथभाऊ चांदगुडे यांनी देशाविषयी स्वाभिमान, देशाभिमान बाळगून देशासाठी कार्य करण्याबाबत सूचित केले. मा. सचिनभाऊ चांदगुडे यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक कष्ट करून अभ्यासात प्रगती करावी, विद्यालयाचे व आपल्या देशाचे नाव उज्वल करावे असा शुभसंदेश याप्रसंगी दिला. श्रीम. शोभा माळी यांनी विद्यालयास पाच इलेक्ट्रॉनिक ब्लोअर भेट दिले. विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दिगंबर कासोदे, सुनील जेजुरकर, पवनकुमार चांदगुडे, असलामभाई, दवंगे एस.यू. थोरात के. जी. आर.के. मोरे, सारबंदे एन.एच. शेख आर.एन. निळकंठ पी.ए. गुंजाळ बी.व्ही. पवार आर.बी. राऊत एस.एल. यांनी शालेय गणवेश दिले. याप्रसंगी वॉटर प्युरिफायरसाठी संतोष पर्हे, संजय चव्हाणके, गोरख गाडे, बापू तनपुरे, नानासाहेब बनसोडे, विनायक गाडे, पवनकुमार चांदगुडे, शिवाजीराव धेनक यांनी आर्थिक मदत केली. या कार्यक्रमासाठी भास्करभाऊ चांदगुडे, महेश गाडे, प्रभाकर शिंदे, अशोकराव माळी, कैलास माळी, भगीरथ गाडे, प्रकाश शिंदे, शरद गरुड, अनिता शिंदे, कापसे, हिरा नाडेकर, मालिनी कचरे, तेजस नेवासकर, प्रियंका थोरात, छाया चव्हाणके, शुभांगी शिंदे, सुनील गाडे, शेखर चांदगुडे, कमलाकर चांदगुडे, प्राचार्य मांडवडे ए.आर. शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शालेय व्यवस्थापन विकास समिती, सर्व सदस्य, माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोरे आर. के. व कुशारे डी. एन. यांनी केले व शेवटी आभार श्री. निळकंठ पी.ए. यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी
पर्यवेक्षक दवंगे एस.यु., मोरे आर. के ,सारबंदे एन. एच, शेख आर. एन, कुशारे डी. एन. राऊत एस. एल, निळकंठ पी.ए. गोडे एस. एम, बागुल जी. एम, थोरात के. जी, सोनवणे एस. व्ही. गुंजाळ बी.व्ही. माळी ए.पी., कदम एन.आर. चौधरी एच. एस. कोल्हे एम.एल. भुजबळ पी.एच. गोपाळे एस. के. कापडणीस एच.डी. लांडगे व्ही. पवार आर.बी. सोनवणे मॅडम, मोहन जाधव, पवार एस. एस. पेटारे ए. बी, काशीद एस. एस, सुपेकर जे. डी., कांदळकर व्ही. ए., गाडे मॅडम, कदम टी. ए., चांदगुडे मॅडम, पवार एस. एस, मंडलिक एस. टी., कापसे के. डी. या सर्व सेवकांनी प्रयत्न केले.















