prabodhini news logo
Home चंद्रपूर माजी सैनिक व अर्धसैनिकांसाठी मोफत कायदेशीर सेवा – १८ ऑगस्टला मार्गदर्शन कार्यक्रम”

माजी सैनिक व अर्धसैनिकांसाठी मोफत कायदेशीर सेवा – १८ ऑगस्टला मार्गदर्शन कार्यक्रम”

0
159

चंद्रपूर प्रतिंनिधी – माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच मोफत कायदेशीर मदत पुरवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात वीर परिवार सहायता योजना समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे मार्गदर्शन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना माजी सैनिक संघटना अध्यक्ष हरीश गाडे यांनी सांगितले की,
“याअंतर्गत सर्व आजी-माजी सैनिक, अर्धसैनिक व त्यांच्या परिवारांना न्यायालयाकडून मोफत कायदेशीर सेवा मिळणार आहे. ज्यांच्या कोर्टात खटले सुरू आहेत किंवा ज्यांना वकिलांची आवश्यकता आहे, त्यांना न्यायालयाकडून मोफत वकील उपलब्ध करून दिले जातील. यासाठी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर येथे नोंदणी करणे आवश्यक आहे.”

या संदर्भात १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सैनिक कल्याण ऑफिस येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने माजी सैनिक, वीर माता-पिता, वीर पत्नी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गाडे यांनी केले आहे.

सैनिक कल्याण समितीमध्ये यापूर्वी कलेक्टर, एस.पी., सैनिक वेल्फेअर ऑफिसर तसेच माजी सैनिक प्रतिनिधींचा समावेश होता. दर महिन्याला होणाऱ्या बैठकीत माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले जात होते. आता या नवीन योजनेत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात वकील सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध राहतील.

“अनेक सुविधा असूनही सैनिक एकत्र न राहणे ही खेदाची बाब आहे. आता तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन माजी सैनिक संघटना अध्यक्ष हरीश गाडे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here