
सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीसंदर्भात महापालिकेचे स्पष्टीकरण
चंद्रपूर, 19 ऑगस्ट – जनता कॉलेज चौकातील सेव्हन स्टार बेकरीसमोर बांधण्यात आलेले चेंबर अचानक कोसळल्याने एका पादचाऱ्याला अपघात झाला. या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर तसेच काही स्थानिक माध्यमांमध्ये “सदर चेंबर हे चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे उदाहरण” म्हणून सादर करण्यात आले आहे.
मात्र, चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात येते की, ही माहिती पूर्णपणे अपुरी व दिशाभूल करणारी आहे. सदर रास्ता हा राष्ट्रीय महामार्ग असुन रस्त्याची देखभाल,दुरुस्ती ही त्यांच्या मार्फतच करण्यात येते. सदरील चेंबरचे बांधकाम हे मनपाने केलेले नसुन कुणामार्फत करण्यात आले आहे याची मनपाकडे नोंद नाही. त्यामुळे या घटनेचा महापालिकेशी कोणताही थेट संबंध नाही.
त्यामुळे घटनेची पूर्ण माहिती न घेता महानगरपालिकेला लक्ष्य करणे हा प्रकार चुकीचा असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच नागरिकांनी सोशल मीडियावरील अपुरी व दिशाभूल करणारी माहिती तपासून न पाहता प्रसारित करू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.












