prabodhini news logo
Home गोंडपिपरी विशेष लेख – वृध्द आईवडीलांची सेवा हीच खरी सेवा

विशेष लेख – वृध्द आईवडीलांची सेवा हीच खरी सेवा

0
133

आजकाल या आधुनिक युगात माणूस प्रगतीच्या उंच उंच मोठ्या शिखरावर पोहचला आहे. मोठ मोठी नौकरी, आलीशान बंगला, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, पैशाची चढती कमान,या सगळ्यांचा मागे धावताना दिसतो आहे. पण काही ठिकाणी एक गोष्ट मात्र तो विसरत चालला आहे. ती म्हणजे आईवडिलांचा सहवास त्यांची सोबत, हे काही ठिकाणी नाकारले जात आहे.आईवडील नकोसे वाटत आहेत. प्रत्येक आईवडील आपल्या पध्दतीने आपल्या मुलांसाठी तडजोड करतात,पैपैसा जमवतात, काबाडकष्ट करतात. आणि मुलं मोठे होण्याची दाट स्वप्ने बघतात.त्याच आईवडिलांकडे आज मुलं दुर्लक्ष करतांना दिसत आहेत तर काही ठिकाणी हेच चित्र आईवडिलांना क्षणभरही दुरावत नाही असही बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे. मी बघीतलेलं आणि कुठेतरी वाचलेलं हे विदारक सत्य आपल्या समोर मांडत आहे प्रत्येक व्यक्ती हा वृध्दापकाळातून जाणारच आहे,मग हा जीवघेणा खटाटोप का करावा हा मोठा मुख्य प्रश्न समाजात आणि माझ्या मनात ऊभा आहे. वृद्धापकाळ त्यांच्या वयाच्या विचार करता त्यांची मानसिक पातळी कमकुवत होत जाते.आणि त्यांच कधी बोलण्यावरून तर कधी वागण्यावरून नियंत्रण सुटते.ही बाब नैसर्गिक आहे. म्हणून मुलांनी त्या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करून त्यांना समजून घेणं फार महत्त्वाचे आहे वृध्दापकाळ म्हणजे दुसरं बालपणचं असते.या कठीण काळात आपल्या आईवडीलांना प्रेम,जिव्हाळा, आपुलकी त्याच बरोबर मानसिक आधाराची गरज असते.पण काही आईवडीलांची या बाबतीत दयनीय अवस्था असते.त्यांना प्रेमाचा ओलावा द्यायच्या काळात मुलं त्यांना ओझंं समजतात. त्यांनी केलेल्या कष्टाची चीज,झीजलेल्या हाडांची आणि सांडलेल्या घामाची कदर न करता त्यांना घालून पाळून बोलणे हे खूप मोठे पाप करत असतात. आपल्या संस्कृतीत “मातृदेवोभव” अस म्हटलं आहे.आईवडीलांना परमात्मा माणलं आहे.तर दुसरी हे विचित्र बघायला मिळते आहे.आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय कोणत्याही मुलांचे जीवन समृद्ध होऊच शकत नाही हे प्रत्येकांना समजायला पाहीजे.मुलांना हेही लक्षात ठेवलं पाहीजे की ,आज जर आपणं आपल्या आईवडीलांकडे पाठ फिरवली तर उद्या त्यांचे मुलं सुध्दा त्यांच्याशी तसचं वागतील यात काहीच नवल नाही. कारण जीवन हा एक प्रकारचा आरसा आहे.त्यात खोटं कधीच सामावत नाही. जसे असेल तसेच त्यात दिसते.म्हणून जस आपणं वृध्द आईवडिलांशी वागू तसचं आपल्या पीढीकडून आपल्याला परत मिळेल.त्यासाठी प्रत्येक मुलाने हे जाणीन ठेवायला हवी.आईवडील वृध्द झाले म्हणून ओझं नाहीत तर,त्यांच्यामुळे आपण आहोत,आपल्या घराला घरपण आहे.त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांचा हात हातात धरून त्यांना चालायला आधार देणे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणने हेच खरे कर्तव्य आहे. आणि त्यातच खरी माणूसकी आहे.

संगीता बोरकर-बांबोळे
गोंडपिपरी, चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here