prabodhini news logo
Home ठळक बातम्या विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ग्लोबल फाऊंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ग्लोबल फाऊंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

0
182

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – ग्लोबल फाऊंडेशन पुणे यांच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या सहकार्याने राज्यस्तरीय ग्लोबल स्टार पुरस्कार २०२५ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल फाऊंडेशन पुणे यांच्या माध्यमातून हे फाऊंडेशन अंध, अपंग, विकलांग व्यक्तींना मदत करत असुन त्या समवेत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे.
विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या मुलांचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना किराणा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले ग्लोबल फाऊंडेशन यांनी प्रथम वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तसेच या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये ग्लोबल फाउंडेशन व विद्यानिकेतन संस्थेची प्रास्तावना विद्यानिकेतन संस्थेचे मा. शशिकांत कोचळे यांनी केली. तसेच या राज्यस्तरीय ग्लोबल स्टार पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून ७० मान्यवरांना विविध क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, एक पुस्तक, पुष्पगुच्छ, शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मा.रूपाली चाकणकर,(महाराष्ट्र राज्य महिला आयोग.) मा.विजय नाईकल, (क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका) मा. युवराज बेलदारे, (आदर्श नगरसेवक) मा. प्रियंका निकम, (पोलीस उपनिरीक्षक भारती विद्यापीठ पो.स्टेशन) मा.रुपेश टाकळकर, (डायरेक्टर इंडिया प्रा. लि) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच या पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी विद्यानिकेतन संस्थेचे पुण्यातील सभासद वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले. पुरस्कार सोहळा संपूर्ण यशस्वी करण्यासाठी मा. सत्यजित माने देशमुख, मा. नवनाथ गवळी, मा. सुनीता गवळी, मा. श्वेता उपाध्ये, मा. सरला पाटील, मा.वर्षा शिंदे, यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती शाळा या शाळेचे उपशिक्षक मा. हांडे यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे आभार मा. श्वेता उपाध्ये यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here