prabodhini news logo
Home ठळक बातम्या राजारामनगर महाविद्यालयात NEP कार्यशाळा उत्साहात संपन्न…*

राजारामनगर महाविद्यालयात NEP कार्यशाळा उत्साहात संपन्न…*

0
81

जगदीश वडजे (नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी)
कर्म.रा.स.वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेचे- कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय राजारामनगर येथे मंगळवार, दिनांक 26/08/2025 रोजी नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-अर्थात NEP-अभ्यासक्रम परिसंवाद’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एन. कारे सर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.एन.व्ही. गवळी हे अध्यक्षस्थानी होते.
या विषयावर बोलताना डॉ. कारे यांनी एस.वाय.बी.ए./बी.कॉम./ बी.एस्सी.च्या बदललेल्या नवीन अभ्यासक्रम पॅटर्ननुसार विद्यापीठ स्तरीय शिक्षण, त्याचे विविध टप्पे, पदवी वर्ष वर्गवारी,विषय निवड, स्पेशलायझेशन, क्रेडिट सिस्टम, विषय कार्यभार, ओपन इलेक्टिव्ह, शैक्षणिक सहल, एक्स्ट्रा क्रेडिटस्, फिल्ड व्हिजिट व प्रोजेक्टस् आदींविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या विविध प्रश्नांचे-शंकांचे निरसन केले.
यावेळी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री सोनवणे, श्रीमती लोखंडे, तसेच इतर सर्व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एम.आर.महाले यांनी केले, तर आभार श्री.एस.के.पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here