
संदीप अवधुत वणी प्रतिनिधी – आगामी काळात गणेश उत्सव इद ए मिलाद साजरा होत असून वणी पोलीस स्टेशनंच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी गणपती आगमन होण्यापूर्वी परिसरात कायदा सु व्यवस्था व शांतता सुरळीत राहावी कायद्याचे उल्लंघन होऊ नये करिता वणी पोलीस ठाण्यात शांतता समिती, पोलीस पाटील तसेच गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांना प्रत्यक्ष मिटिंग साठी बोलावून कायदा व सुव्यवस्था राखणेकामी सूचना आढावा व देण्यात आल्या सर्व मंडळानी गणपती बसवण्यापूर्वी कायदेशीर परवानगी घेणे, मंडळाच्या ठिकाणी विजचोरी न करता महाराष्ट्र वीज वितरण कडून रीतसर ऑनलाईन फॉर्म भरून उचल मीटर घेणे,डीजे, बँड,ऑर्केस्ट्रा,वैगैरे हे दिलेल्या नियमानुसार वाजवणे नियमांचे उल्लंघन न करता काटेकोर पालन करणे, गावात परिसरात वाद होऊ नये म्हणून शांतता समितीने लक्ष केंद्रित करणे, गणपती विसर्जन करते वेळी स्वयंसेवक नेमणूक करणे, शिवाय इतर धर्मादायी संस्थांनि सहभाग नोंदवावा तसेच ग्रामपंचायत कडून मिरवणुकीच्या मार्गांवर असलेले खड्डे बुजविण्यात यावे याबाबत स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी ग्रामपंचायत अधिकारी संजय देशमुख यांच्याशी तात्काळ फोन वर चर्चा करून ठराव देखील करावयास सांगगितला.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उप निरीक्षक गणेश कुटे, हेमंत राऊत,वणी बीटचे पोलिस हवालदार मुजावर देशमुख. जगदंबा देवी मंदिर ट्रस्ट चे गणेशदादा देशमुख,खंडेराव मंदीर ट्रस्ट चे बाळासाहेब घडवजे,मयूर जैन,समाजसेविका मीना पठाण सर्व होमगार्ड,सर्व पोलीस पाटील,शांतता समितीची कमिटी,महाराष्ट्र राज्य वितरण चे सहाय्यक अभियंता धनराज ठेपने,सचिन कड,नॅशनल जर्नालिस्ट असोसिएशन चे अमोल भालेराव,संदीप अवधूत,यांचे सह परिसरातील महिला व मान्यवर उपस्थित होते.















