
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – आज कवी कुसुमाग्रज औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड येथे कौशल्य आधारित व्यावसायिक शैक्षणिक वर्षात प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत व संस्था परिचय करून देण्यात आला. संस्थेत प्रशिक्षणार्थ्यांचे
स्वागत उत्साह पूर्ण व आनंदी वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्राचार्या सौ. सुनीता शिंदे होत्या. संस्थेतील प्राचार्यांसह संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित सर्व नव्या प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत फुलांचा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी सौ सुनीता शिंदे यांनी संस्थेची आजपर्यंतची वाटचाल संस्थेचे प्रशिक्षणार्थ्यांसाठी राबवले जाणारे विविध उपक्रम संस्थेची गौरवशाली परंपरा या विषयी माहिती दिली. यशवंत तेलोरे यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करताना व्यावसायिक शिक्षण काळाची गरज आहे. स्वयंरोजगारासाठी असणाऱ्या विविध आस्थापना व संधी या विषयी माहिती दिली. विजय गवळी यांनी भविष्यातील आयटीआय नंतर उच्च शिक्षणाच्या विविध संधी व व्यवसायासाठी लागणारे कौशल्य मेहनत शिस्त व वेळोचे नियोजन याविषयी मार्गदर्शन केले.
जयश्री फिरके यांनी आयटीआय नंतर शिकाऊ उमेदवारी साठी प्रशिक्षणार्थ्यांना करावे लागणारे कागदपत्र पूर्तता व नोंदणी कशी करावी याविषयी माहिती दिली. किरण सोनवणे यांनी प्रवेश प्रक्रियेनंतर करावे लागणारे आवश्यक ते नोंदणी व करावी लागणारी पूर्तता याविषयी माहिती दिली. शिकाऊ उमेदवारीसाठी निवड केलेल्या प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. सोबत आलेल्या पालकांचे देखील स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. पालक वर्गातून संतोष झोटिंग यांनी संस्थेच्या सहकार्याविषयी व शिस्त याविषयीअतिशय छान मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला संस्थेतील सौ.पी बी संगमनेरे, आर जी वायकुळे, एस वाय राजोळे, एस आर शिंदे, डी बी फड, एस एस वंजारी, एम आर जाधव, पी एस जाधव, एस एस वाघ, ए पी दरोगे, एस डी खळे, एस आर भालेराव संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश महाले यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.















