
वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जील्हा चंद्रपूर
वरोरा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज – उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे १ सप्टेंबर २०२५ पोषण माहचे उद्घाटन जोरदार व उत्साहात करण्यात आले.हा कार्यक्रम डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे सहाय्यक अधीसेवीका यांनी घेतला.कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका,गितांजली ढोक आहार तज्ञ, डॉ सातभाई वैद्यकीय अधिकारी, डॉ प्रविण केशवाणी दंत चिकित्सक,सतिस येडे आरोग्य साहाय्यक, यांच्या उपस्थितीत पोषण माहचे उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला.या पोषण माहाच्या निमित्ताने वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका यांनी समज गैरसमज,टिप्स फायदे तोटे समजावून सांगितले व सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले या महिन्याभरात वेगवेगळे कार्यक्रम घेऊन जनजागृती प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे.त्यासाठी आवर्जून हिरारीने भाग घ्यावा असे जनतेला कळविण्यात येत आहे.तसेच गितांजली ढोक आहार तज्ञ यांनी आहार विषयी मार्गदर्शन केले.पोष्टर प्रदर्शित बाॅनर,कळधान्य,फळभाजि,फळ, पालेभाज्या यांची प्रदर्शन करण्यात आले होते.हा कार्यक्रम १ सप्टेबर ते ३० सप्टेंबर पर्यंत चालणार आहे . तरी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे..















