prabodhini news logo
Home चंद्रपूर अनधिकृत मोबाईल टॉवरविरोधातील शिवसेनेच्या लढ्याला यश – प्रशासन झुकले!

अनधिकृत मोबाईल टॉवरविरोधातील शिवसेनेच्या लढ्याला यश – प्रशासन झुकले!

0
148

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – भद्रावती गौतम नगर (स्नेहल नगर) येथे परवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मोबाईल टॉवर विरोधातील शिवसेना (शिंदे गट) तर्फे सुरू केलेल्या साखळी उपोषण आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.

हे आंदोलन शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वाखाली दमदारपणे पार पडले.

आज आंदोलन स्थळी माननीय आमदार करण देवतळे यांनी भेट देऊन आंदोलकांची भूमिका ऐकली. नागरिकांच्या भावना आणि शिवसेनेची ठाम भूमिका लक्षात घेऊन आमदार साहेबांनी सर्व मुद्दे मान्य करत खालीलप्रमाणे आश्वासन दिले :

संबंधित मोबाईल टॉवरचे काम तत्काळ थांबविण्यात येईल.

परवानगीशिवाय टॉवर उभारणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.

शिवसेनेच्या ठाम लढ्यामुळे प्रशासनाला झुकावे लागले आहे. आमदार साहेबांच्या विनंतीचा मान राखत आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले, मात्र गरज पडल्यास पुन्हा उग्र लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला.

हे आंदोलन यशस्वी ठरले असून, हा विजय सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा आहे असे मनोगत शिवसैनिक सुरज शाहा यांनी व्यक्त केले.
यावेळी युवा शिवसैनिक सुमित हस्तक, महेश जीवतोडे, अर्चनाताई खंडाळे, लक्ष्मी गेडाम, निर्मला पेटकर, धबु असूटकर, माधुरी फुकट, प्रिया तेलंग, सीमा वानखेडे, वैशाली चालखुरे, सरस्वती दानव, प्रतिभा नागपुरे, नंदा कोरडे, वैशाली तेलंग, नंदा ठमके, सिंधु देऊरकर, सुनिता उताने, अरुण मत्ते, यशवंत उताणे, अशोक चिलके, मंगला अशोक चिलके, पुष्पा किशोर सीरसैया आंदोलनात सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here