
नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने, अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली “वोट चोर गद्दी छोड” या राज्यस्तरीय निषेध मेळाव्याचे आयोजन कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आले.
मोदी सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोग संगनमताने लोकशाहीवर गदा आणत आहेत, मतदार याद्यांमधून लाखो नावे जाणून-बुजून वगळून मतदानाचा हक्क हिरावला जात आहे, या अन्यायाविरोधात काँग्रेसने आवाज उठवण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून ते कामठी सभास्थळापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेले.
या मेळाव्यास काँग्रेसचे नेते मा. बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. नामदेव किरसान, खा. श्यामकुमार बर्वे, खा. प्रशांत पडोळे, खा. बळवंत वानखेडे, आ. अभिजीत वंजारी, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री यशोमती ठाकूर, सतेज पाटील, राजेंद्र मुळक, कुणाल चौधरी, प्रफुल गुडदे, संजय मेश्राम यांसह पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.















