
शिक्षक दिनी आईला
वंदन प्रेमाने करू
तिच्या शिकवणीने
स्वप्न मोठे साकारु
आई योग्य समज देई
कठीण परिस्थितीत
तिच्या महान उपदेशाने
यशाचा मार्ग होतो प्रतित
आई करुणा सागर
ज्ञानाचा अखंड झरा
तिच्या मार्गदर्शनाने
सुख मिळतो खरा
प्रामाणिकपणा संयम
शिकवले जीवन मार्ग
आईच्या संस्कारामुळे
आला जीवनाला अर्थ
शिक्षकदिनी आईपुढे
विनम्र सारे होऊया
तिच्या आशीर्वादाने
ध्येय आपुले गाठुया
डॉ.स्मिता गजभिये/तिरपुडे
लाखनी,जिल्हा.भंडारा















