prabodhini news logo
Home पुणे प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – प्रेम

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – प्रेम

0
107

काय असत प्रेम…
नुसत आवडणं… की आकर्षण…
की त्याच्या ही पलीकडे
अजून काहीतरी असत…
आदर… भीती …एकतर्फी…
अस कितीतरी प्रकारचं प्रेम असत…
पण खर प्रेम काय असत…
अन् ते असत का कधी???
एकमेकांचा विचार होतो का कधी…
कायम जपल जात का ते मनात तुमच्या…

प्रेमाची कितीतरी उदाहरण पाहतो आपण
प्रेम ही नितळ अन् अमूर्त भावना आहे
अन् ती अभिजात असते.
ती आतून मनातून येते… ती आणावी लागत नाही
ती दाखवावी लागते असं ही काही नाही….
ती मनात ठेवून सुध्दा प्रेम करता येतं की…
प्रेम फक्त त्याच किंवा तीच असत अस ही काही नाही
राधा कृष्ण यांचे प्रेम काय होते आणि
मीरा बाई अन् कृष्ण यांचे नाते काय होते.
विशुद्ध प्रेमाची उदाहरणे आहेत ही.
सगळ्यात मोठा प्रेमाचा भक्ती भाव विठुराया अन् त्यांचे
भक्त गण आहेत. अस प्रेम …तो भक्ती भाव आपल्याला मोजता येईल ??
शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे
यांच्या प्रेमाचे मोजमाप करता येईल का कधी???
कोणत्या प्रकारचे प्रेम होते ते मग… फक्त एक आज्ञा..
अन् जीवावर उदार होऊन मावळे जात असत .
सीमेवर चे जवान आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची आहुती देतात ते किती उच्च कोटींचे प्रेम नाही का??
अशी किती तरी उदाहरणे आहेत. आपल्या अवतीभोवती प्रेमाची. आईवडिल यांच्यावर असणारे प्रेम…त्यांचं मुलांवर असणारं प्रेम…
हेही प्रेम च असत की..
बहीण भावाच्या प्रेमाची गोष्ट च वेगळी असते.
या नात्यात मोजता येत का प्रेम कधी???
आवडत्या कलेची जोपासना करणे ती वाढवणे हे ही कलेवरच निंतांत प्रेम दर्शवित असत.
एकतर्फी असणारं प्रेम… ज्यात काही अपेक्षा नसते.
फक्त वाट पाहणे…आठवणींवर जगणे असते….
आयुष्य भर तेही केलं जात.

कधी कधी आपण बोलून जातो की
मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं पण काय उपयोग झाला त्याचा मग हे प्रेम नसत.तो व्यवहार असतो..
आणि जेंव्हा प्रेमात व्यवहार येतो तेंव्हा त्या नात्याला काही अर्थ रहात नाही. प्रेमात देवाण घेवाण असावी..
ती आपुलकीची…मायेची…हक्काची…..आदराची…अन् त्यागाची…असावी. तो पण का अन् कशा साठी केला याचा मागमूसही नसावा कधी.

प्रेम कशात नसत …
सृष्टीतल्या प्रत्येक चराचरात असत…
राधेच्या प्रेमात असत… मीरा बाई च्य्या भक्तीत असत…
हुकूम अन् आज्ञा पाळण्यात ही असत…
भक्ती रसात तल्लीन होऊन जाण्यात असत…
कलेची साधना करण्यात असत…
दगडात ही देव शोधण्यात असत…
प्रेमाला उपमा नसतेच कधी …ते देवा घरचं देणं असत…

प्रेम …
नात जपण्यात असत….नात जोपासण्यात असत..
कुणाची तरी वाट पाहण्यात असत…
अन् आठवणींवर आयुष्य जगण्यात असत…..
मैलाचा दगड होऊन वाट पाहण्यात असत….

शेवटी….
मी असा विचार करते की आयुष्यात प्रेम शोधणं ही एक उपासना च असते. करावी ती प्रत्येकाने….
प्रेमाची व्याख्या करता येते का??
नाही ना करता येत…
कोणत्याही व्याख्येत ते बसत नाही.
आणी ती करायची असेल तर ती आयुष्य जगताना तरी करू नये…. ती करावी … आयुष्याच्या संध्याकाळी…
सहज मागे वळून पहावं की एखाद्या बद्दल ( ती कोणीही असू शकते ) ती भावना काय होती.
ते प्रेम होत … मैत्री होती…भक्ती भाव होता…
की आणखी काही…..

आशालता भोसले
इंदापूर, पुणे जिल्हा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here