
शिक्षक ज्ञानाचा झरा
अफाट ज्ञानाची खोली
अमृताची धारच जणू
खूप गोड त्यांची बोली ।।१।।
दिवस रात्र एक करतात
सर्वच विद्यार्थी घडवतात
ज्ञानाची ही नीती मूल्यच
आदर्श समाजात पेरतात ।।२।।
आई वडील हे पहिले गुरू
ते आपणांस जन्म देतात
पण दुसरे गुरू शिक्षकच
शाळेसाठी सर्व त्याग करतात ।।३।।
शिक्षक असतात मेहनती
पेरत जातात खरे संस्कार
शिक्षकांचे आपल्यावर
खूप असतात उपकार ।।४।।
शिक्षकांचे कधी सुद्धा
ऋण फिटतच नसते
प्रत्येक शिक्षकांची जागा
आपल्या हृदयात असते ।।५।।
अशा या थोर शिक्षकांना
करू या चला त्रिवार वंदन
त्यामूळेच फुलत राहतेच
आपल्या यशाचे नंदनवन ।।६।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर















