
भद्रावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : आज दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय येथे भेट देण्यात आली. या वेळी मतिमंद मुलांना ज्योती चंद्र यांच्या हस्ते भेटवस्तू व खाऊ वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमात अंजली मेश्राम, वंदना मनपे, नीलिमा पाटील तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले.
समाजातील गरजू व उपेक्षित घटकांना मदतीचा हात देणे हे आपले कर्तव्य असल्याचे उपस्थितांनी सांगितले. तसेच अशा प्रकारचे नवीन सामाजिक उपक्रम राबवत राहण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.















