
ब्रह्मपुरी – झाडीपट्टी नाटय विकास मंडळ व्दारा वडसा येथे आयोजित ५ व्या झाडीपट्टी नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हा विमोचन सोहळा नागभिड येथील डेव्हिड सभागृहात झाडी नाटय विकास मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकरांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच संपन्न झाला. झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे बोधचिन्ह नाट्यप्रेमी किशोर उरकुंडवार यांनी काढले आहे.
यावेळी नाटयसंमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड झालेली विनोदी नट के.आत्माराम, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ शेखर डोंगरे,अभ्यासक डॉ धनराज खानोरकर, नाट्य अभ्यासक डॉ राजकुमार मुसणे,कलावंत विश्वास पुडके ,लोकेश कुमार,पायल कडूकर ,पोर्णिमा तायडे,मनीषा देशपांडे,स्वप्निल बन्सोड हे नाट्य कलावंत व हिरा मडावी, धम्मदीप सोनटक्के , रक्षित रामटेके आदी नाटयप्रेमी उपस्थित होते.















