prabodhini news logo
Home ठळक बातम्या वणी पोलीसांच्या शिलावर शिंतोडे उडविणाऱ्या “दोषींना” एकदा पोलिसी खाक्या दाखवाच.

वणी पोलीसांच्या शिलावर शिंतोडे उडविणाऱ्या “दोषींना” एकदा पोलिसी खाक्या दाखवाच.

0
263

संदीप अवधूत नाशिक ग्रामीण – नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणारे दिंडोरी तालुक्यातील वणी हे महाराष्ट्र व गुजरात या सीमेवरील दोन राष्ट्रीय महामार्ग लाभलेले वणी पोलिस ठाणे,महाराष्ट्रातील अर्ध शक्तीपीठ असल्याने दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या ही जास्त आहे,या पोलिस ठाण्याची हद्द ही खूप मोठी असल्याने आणि त्यात कमी मनुष्यबळ तरी या परिस्थितीत कायदा सुव्यवस्था चोख राखत खिंड लढवणाऱ्या निर्भिड पोलिस अधिकारी लेडी सिंघम सहाय्यक पोलिस नीरीक्षक गायत्री जाधव या अपुरी कर्मचारी संख्या असूनही रात्रीचा दिवस करून परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यात अल्पावधीतच यशस्वी ठरलेल्या आहेत,मात्र कुठल्याही चांगल्या कामाला दृष्ठ लागावी तशी त्यांच्या चांगल्या कामाला गावातील एका कळलाव्या वृत्तीच्या खोडसाळ व्यक्तीची दृष्ट लागली.आणि परचा कावळा करणे काय असते याचा अनुभव वणी पोलिसांना त्याच्या एका वर्तांकनात आला,परिसरात अवैध गुटखा विक्री होत आहे अशी या इसमाने बातमी स्वतः चे नाव न लावता प्रकाशित केली.वणी गावात काहीतरी उचापत करायची म्हणून पराचा कावळा कसा करायचा या महोदयांनी थेट वणी पोलिस ठाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाहक बदनामी करण्याचा प्रकार केला आहे.आपल्या लेखणीचा गैर वापर करत या महाभागाने गावात कान भरण्याचा जूना उद्योग सुरू केला असे दिसते.दुसऱ्याच्या नावाने बातमी प्रसारित करून नामानिराळे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.अगदी नेहमीच्या शैलीत दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत.या बातमीत वाटेल ते आरोप पोलिसांवर केलेले असले तरी खरे काय आणि खोटे काय हे जनता जाणून आहे.वास्तविक सदरीलज्या एका वृत्तपत्रात जी बातमी प्रसिद्ध झाली त्या बातमीत असे म्हटलं कि दिंडोरी तालुक्यात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट तर सदरील वृत्तपत्रात बातमी प्रकाशित करणाऱ्या किंव्हा पोर्टल वृत्तवाहिनी, दैनिकांच्या माध्यमातून कायमस्वरूपी बातम्या लावणारा स्वयंघोषित नाकानी कांदे सोलणाऱ्या व हुकूमशाही गजावणाऱ्या स्वयंघोषित पत्रकार यांनी नेपाळ, देशातून अधिस्वीकृत पत्रकारिता प्रमाणपत्र मिळवले कि काय? असा सवाल निर्माण होत आहे. हे स्वयंघोषित पत्रकार महोदय ज्या व्यक्तीची गुटखा तस्कर म्हणून चर्चा करतात त्या व्यक्ती सोबत यांनी मांडीला मांडी लावून अनेकांच्या पाणी ओतण्याचे काम केलेले आहे.मात्र खांदा वापरायला मिळाला नाही की बदनामी करायची अशी जुनी सवय असलेला आणि या विषयाशी निगडित असलेला जो कोणी “दोषी” पोलिसांसोबत व आदिवासीं नेतृत्वबदल आकस बुद्धिने वागून चॅलेंज देत असेल तर याचे मागील रेकॉर्ड पोलिसांनी काढावे आणि बघावे की सत्य असत्त्य काय आहे सदरील लेडी सिंघम या काळीच्या नारदाला ध्यानावर आणतील का असा सूर परिसरातून उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here