
जगदीश वडजे नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी – कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेचे-कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजारामनगर येथे बुधवार दिनांक 17/09/2025 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत बहिःशाल शिक्षण मंडळाचे उद्घाटन खेडगाव महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.व्ही.एस. शिंदे सर यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून प्रा. शिंदे यांनी संबंधित विभागाविषयी व त्याअंतर्गत येणाऱ्या डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या व्याख्यानमाले सोबतच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बी.के.कावळे विद्यालयाचे प्राचार्य श्री.व्ही.जे. जाधव सर अध्यक्षस्थानी होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एन.व्ही.गवळी आदींसह सर्व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक या विभागाच्या प्रमुख श्रीमती जी.वाय.पवार यांनी केले. सूत्रसंचालन दिपाली कावळे या विद्यार्थीनीने केले. तर श्रीमती वाय.आर. खैरनार यांनी उपस्थितांचे आभार मानले















