prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूर रहमतनगर क्लोरीन गॅस गळतीची गंभीर दखल

चंद्रपूर रहमतनगर क्लोरीन गॅस गळतीची गंभीर दखल

0
104

Prashant Ramteke chief editor – रहमतनगर परिसरात झालेली क्लोरीन गॅस गळती ही नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर घटना आहे. या प्रकरणी मी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

स्थलांतरित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून देण्यासोबतच, ज्यांना श्वसनाचा किंवा अन्य त्रास जाणवत आहे अशा सर्वांवर त्वरित वैद्यकीय उपचार व्हावे, यासाठी मी स्वत: प्रशासनाच्या संपर्कात आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नाही.

भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, मी स्वतः या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here