prabodhini news logo
Home ठळक बातम्या बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश नाकारण्याचा नियम शिथील करावा यासाठी विद्यार्थी नेते...

बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश नाकारण्याचा नियम शिथील करावा यासाठी विद्यार्थी नेते सागर भिसडे यांची मागणी

0
170

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – विद्यापीठाच्या एका अतिशय महत्वाच्या नियमाबाबत विद्यार्थीहितासाठी हे निवेदन देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहिती नुसार असा नियम आहे की, “फक्त ज्यांनी प्रथम वर्ष पूर्णपणे पास केले आहेत, त्यांनाच द्वितीय वर्षासाठी वसतिगृह प्रवेश दिला जातो.” या नियमामुळे पहिल्या वर्षात एखाद्या किंवा दोन विषयांमध्ये बॅकलॉग असलेले पण शिक्षण चालू ठेवणारे विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रवेशापासून वंचित राहतात. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे.

त्यामुळे होणारे परिणामः

ग्रामीण, दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना राहण्याची मोठी अडचण

शिक्षण सोडण्याची शक्यता वाढते मानसिक तणाव व सामाजिक अपमानाची भावना महाविद्यालयात येणे कठीण होऊन पाठांतरात मागे पडणे

निवेदन मध्ये मागणी खालील मागणी केली.

“ज्यांच्या पहिल्या वर्षात एक किंवा दोन विषयांमध्ये बॅकलॉग आहेत, पण ते नियमितपणे दुसऱ्या वर्षाचे वर्ग चालू ठेवत आहेत, अशा विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याची परवानगी द्यावी.”

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान थांबेल व त्यांनी शिक्षणात सातत्य ठेवले पाहिजे असा सकारात्मक संदेश जाईल.
या होणाऱ्या अन्यायकारक नियमामध्ये बदल करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा ही निवेदन मध्ये मागणी केली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here