prabodhini news logo
Home ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0
217

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – नंदगोपाल फाउंडेशन भंडारा व मित्र मंडळ खोकरला यांच्या संयुक्त विद्यमानाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भोजापूर नहर रोड वरील रजनी नगर व गंगानगरच्या परिसरात विविध प्रजातींची वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण कार्यक्रमाला नंदगोपाल फाऊंडेशनचे विलास केजरकर, राहुल मेश्राम, अशोक गोन्नाडे, अविनाश घाटबांधे, रत्नाकर शहारे, सोनु पाठेकर, युवराज गोंडाणे, चंदन पालांदुरकर, अरविद बारई, जयंत उपाध्ये, विजय करंडे, भाऊराव वंजारी, एकनाथ भगत इत्यादी मान्यवर आणि रजनी नगर व गंगानगर येथील कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहर रोड भंडाराच्या मैदानावर, जांभूळ, करंजी, गुलमोहर, सप्तपर्णी, टोबालिया अशा विविध प्रजातींचे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here