
“बेसलोडपासून संतुलनाच्या दिशेने नव्या ऊर्जा युगात पारंपरिक वीज व्यवस्थेचा पुनर्विचार” ह्यावर महाचर्चा
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर- आधुनिक भारताचे विश्वकर्मा म्हणून गणना केल्या जाणारे जागतिक कीर्तीचे अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा केला जाणारा अभियंता दिन, ग्रॅज्युएट इंजिनिअर असोसिएशन तर्फे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात येथे उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालक रामचंद्र उकिरडे व ग्रीन लाईफ सोलूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित देवतळे यांची उपस्थिती होती, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड साहेब उपस्थित होते. याबरोबरच उपमुख्य अभियंता शाम राठोड, डॉ.भूषण शिंदे,रवींद्र सोनकुसरे,अमित बनकर, अधीक्षक अभियंता महेश पराते,फणिंद्र नाखले, संजय हिरवे, दिलीप सराग,परेश इटकळकर, जीईए चे केंद्रीय सचिव सुयोग झुटे,नवल दामले केंद्रीय अध्यक्ष शीतल वंजारी ,राज्यसचिव विजयसिंग राठोड, विभागीय सचिव मकरंद परदेशी, विभागीय अध्यक्ष हिमांशू कुमार सिंग, कार्याध्यक्ष जयंत पारखी उपस्थित होते.याबरोबरच संघटनेचे चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, नाशिक, भुसावळ येथील प्रतिनिधी तसेच चंद्रपूर विद्युत केंद्रातील अभियंते, ट्रेनी इंजिनियर्स,असे जवळपास तीनशे अधिकारी उपस्थित होते.मकरंद परदेशी यांनी संघटनेची कार्यपद्धती,नवीन संकल्पना व महानिर्मितीने यावर्षी गाठलेली उद्दिष्टे यांच्याबद्दल माहिती दिली.
त्याच बरोबर विद्युत केंद्रात काम करत असताना कोल मिल गियर बॉक्समध्ये तांत्रिक बदल करून उत्कृष्ट काम केल्याबद्दल सागर नखाते ह्याचे विशेष कौतुक करून त्यांचा गौरव केला त्याचबरोबर महानिर्मितीने अभियंता दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेले तेजस्विता राऊत,शशांक राऊत,स्वराज आमले,वैभव शेळके,संकेत देवरे,विशाल जामकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दरम्यान “बेसलोडपासून संतुलनाच्या दिशेने: नव्या ऊर्जा युगात पारंपरिक वीज व्यवस्थेचा पुनर्विचार” संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चेदरम्यान विचार करताना पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील आव्हाने,पारंपरिक ऊर्जानिर्मितीचा पुनर्विचार याबद्दल पॅनल चर्चेतून वैचारिक मंथन करण्यात आले.अमित देवतळे यांनी सौर ऊर्जा तसेच पवन ऊर्जा,बायोगॅस ऊर्जा या अपारंपारिक ऊर्जा क्षेत्र व त्यांची कार्यक्षमता यावर प्रकाश टाकला,रामचंद्र उकिरडे यांनी ऊर्जानिर्मिती च्या क्षेत्रामध्ये थर्मल ऊर्जा व त्याचे ग्रीड स्टॅबिलिटी यांचे महत्त्व विषद केले,सुयोग झुटे यांनी पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जा निर्मितीमधील आव्हाने,संधी आणि तांत्रिक बाबी यावर प्रकाश टाकला,
केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी महानिर्मिती समोरील आगामी काळात असलेली आव्हाने,तसेच असणारी उद्दिष्टे साध्य करण्याकरिता उपस्थित अभियंत्यांना मार्गदर्शन केले व अभियंत्यांनी रोजच्या कामाबरोबरच नवीन तंत्रज्ञान शिकून आपल्या महानिर्मितीच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलावा असे प्रतिपादन त्यांनी या क्षणी केले. ह्या चर्चासत्राचे सूत्रधार म्हणून स्वराज आमले ह्यांनी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल जामकर,मनोज शेखावत, नीलेश शिंदे, शिरीष परिहार,गुरुपाल गायधने,मंगेश रुद्रवार, रोशन लोहे,राहुल असावा,सुदीप गुठे व इतर पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन अंकिता सिंग यांनी सांभाळली, तर आभार प्रदर्शन गुरुपाल गायधने यांनी केले. राष्ट्रगीत व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.















