prabodhini news logo
Home चंद्रपूर बेलदार समाज संघटना बाबूपेठ तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

बेलदार समाज संघटना बाबूपेठ तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

0
185

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी, रविवार दुपारी 3 वाजता सिटी माध्यमिक विद्यालय, महादेव मंदिर जवळ, बेलदार समाज संघटना बाबूपेठ तर्फे इयत्ता 10वी व 12वी मध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. अशोक पुल्लावार, डॉ. मा. भास्कर झलके, मा. दिलीपभाऊ गडमवार, मा. अतुल कुणारपवार, मा. रघुनाथजी रेगुलवार, सुभाष गाजेवार, मा. गिरीश शेंडे, मा. राकेश शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक मा. अशोक पुल्लावार यांनी करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व मार्गदर्शन दिले. तर डॉ. भास्कर झलके यांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, आयुष्यमान कार्ड योजना याबद्दल सखोल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना करिअर निवडीसंबंधी दिशा दाखवली.

यावेळी मा. गिरीश शेंडे व मा. राकेश शेंडे यांनी उपस्थित समाजबांधवांचे आयुष्यमान कार्ड काढून दिले.

सन 2025-26 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये –

1. रुद्र मोहन आकुलवार
2. अर्जुन नन्नमवार
3. श्रावणी आईलवार
4. सान्वी राकेश पारसंवार
5. तनु शंखदरवार
6. विनीत प्रवीण रेड्डीवार
7. श्रावणी तोटेवार
8. शिवम सुनिल वारुलवार
यांचा समावेश होता. तसेच मा. अतुल कुणारपवार यांचे PSI पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचेही स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन मा. किसन आकुलवार यांनी केले. तर या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी बेलदार समाज संघटना, बाबूपेठचे अध्यक्ष मा. विनोद पेन्लिवार यांनी पुढाकार घेतला.

या कार्यक्रमाला बेलदार समाजाचे महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here