
रामगोपाल अट्टेला
विशेष तालुका प्रतिनिधी,सिरोंचा
गत तीन दिवसापासून तालुक्यातील निवासी शाळांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, अनुसूचित जाती नवबौद्ध मुलींची निवासी शाळा, शासकीय निवासी आश्रम शाळा, या शाळांमध्ये महाराष्ट्र शासन आरोग्यसेवा विभाग तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर. कन्नाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या समूहाने प्राथमिक आरोग्य केंद्र रंगायपल्ली येथील डॉक्टर. सचिन मडावी यांच्या सहकार्याने गोवर रूबेला लसीकरण विशेष मोहीम सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी वय वर्ष पाच ते पंधरा या वयोगटातील वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

तत्पूर्वी विद्यार्थ्यांना गोवर रूबेला लसचे संपूर्ण माहिती देण्यात आले. रूबेलामुळे पुरळ, ताप येण्यापासून प्रतिबंधित करते. गोवर हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार असल्याने वेळेवर लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. असे ताज हुसेन व श्रीमती. संगीता येरोला, आरोग्य सेविका विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तरे संवाद साधून न घाबरण्याचे सल्ला दिले. या विशेष मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती. मनीषा साखरे यांचे मार्गदर्शनाखाली कु.एस.एम रॉय, कुमारी. ज्योत्स्ना रामटेके आय.सी.टी शिक्षिका, आर डी अट्टेला, आणि कु.रवीना मॅडम, जे. एन. उईके गृहपाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.












