
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
mojissports@gmail.com
8104170564*
मिरा-भाईंदर – यावर्षी मिरा-भाईंदरमध्ये नवरात्रोत्सवाला अपूर्व उत्साह लाभला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली सलग चौथ्या वर्षी हा भव्य उत्सव यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांनी नागरिकांना आवाहन केले की,
“नवरात्र हा आपल्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा सण आहे. या उत्सवाला समाजातील सर्व घटकांनी आनंद आणि भक्तीने एकत्र येऊन साजरा करावे. या महोत्सवासाठी देण्यात येणारे पास पूर्णपणे मोफत आहेत. जर कोणी पास विक्रीसाठी ठेवले किंवा पैशाने दिले, तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.”
सध्या उत्सवाची सुरुवात झाली असून, मिरा-भाईंदरमधील नागरिकांनी उत्साहात भाग घेण्यास सुरुवात केली आहे. उत्सवस्थळावर भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळत असून, या सणाने स्थानिक संस्कृतीच्या उत्साहाला नवा उभारा दिला आहे.















