
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – सातपूर (नाशिक): सर्वत्र नवरात्र उत्सव 2025 मोठ्या उत्साहात साजरी होत असतांना युवा प्रतिष्ठान सातपूर कॉलनी च्या वतीने युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बिपिन कटारे यांच्या नेतृत्वाखाली भव्य “मशाल मिरवणूक” काढण्यात आली.
श्री. सप्तशृंगी देवी मंदिर सातपूर कॉलनी येथून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.
मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
नवरात्र उत्सव 2025 च्या अध्यक्ष पौर्णिमा नायर,उपाध्यक्ष मीनाबाई बंदावणे यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.
फेमस मोरे ढोल ताशा वणी मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
यावेळी युवा प्रतिष्ठान चे सदस्य खुशाल गिरणारकर, गणेश खिराडकर,कुशल पाटील,प्रसाद घोलप,नितीन बोबडे,वसीम शेख,सुमित खिराडकर,निलेश मोरे,प्रकाश पवार,विकास गिरणारकर,भाऊ केदारे,आकाश जगताप, सुरज गांगोडे,मयंक सिंग, सिद्धांत कटारे,आर्यन जगताप,साई बंदावणे, पार्थ रेवर,रवी भुसारे,शाहू तिनगोटे, पवार,कबीर रेवर,नयन पवार आदी युवक /महिला/युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.















