
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
मीरा-भाईंदर – शहरातील सर्वात लोकप्रिय सांस्कृतिक सोहळा लोटस नवरात्री २०२५ – सीझन ६ चा दुसरा दिवस धमाकेदार झाला. मैदानावर पारंपरिकतेची आणि आधुनिकतेची एक सुंदर मेजवानी पाहायला मिळाली.
दुसऱ्या दिवशी हजारो उपस्थितांनी गरबा-डांडियाच्या तालावर ठेका धरला. हॅरी नकुम & बँड्स च्या लाईव्ह परफॉर्मन्सने स्टेजवर भन्नाट ऊर्जा निर्माण केली. पारंपरिक व फ्युजन गरब्याच्या सुरावटींनी उपस्थितांचे पाय थिरकले.
रंगीबेरंगी लाईटिंग, आकर्षक डेकोरेशन आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रामुळे संपूर्ण मैदान उजळून निघाले. तरुणाई, कुटुंबे, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनीही या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री यांनीही लोटस नवरात्रीला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीने चाहत्यांचा आनंद दुपटीने वाढला आणि मैदानात टाळ्यांचा गडगडाट झाला.
आयोजक नरेंद्र महेता म्हणाले:
“दुसऱ्या दिवसाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. तिसऱ्या दिवशी खास थीम नाईट ठेवली आहे जी प्रेक्षकांसाठी मोठे आकर्षण ठरेल.”
मीरा-भाईंदरकरांसाठी हा सोहळा फक्त नृत्य-गर्जनाचाच नाही तर मैत्री, संस्कृती आणि उत्सव साजरा करण्याचा सुंदर अनुभव ठरतो आहे.















