
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोज बुधवार ला शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक, चंद्रपूर यांच्या कार्यालयासमोर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या न्याय मागण्याकरिता प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ, चंद्रपूर यांच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले, या उपोषणाला केंद्रीय सरकार्यवाह संजय बोधे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोटघरे, कार्याध्यक्ष प्रीतम सोनारकर सर,, अरुण गायकवाड चिमूर तालुका अध्यक्ष,मनोज वनकर सर वरोरा तालुका सचिव, गुलाब बागेसर, वाशिष्ठ पेटकर वरोरा तालुका अध्यक्ष, दिवाकर डबले, नयन देशकर, कृपलानी शेंडे,भट्टलवार, डॉक्टर रंगश्यामजी मोडक, अमर गोले टकर , जालदर लांडे, प्रमोद सोरते,, विलास रामटेके,प्रांजल रामाजी बेलखुडे, नीता रामाजी बेलखुडे,दिगांबर दुर्योधन उपस्थित होते.आज प्रजासत्ताक कर्मचारी संघ यांच्या सर्व मागण्या माननीय शिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी सोडविण्याचे आश्वस्त केल्यानंतर आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.















