prabodhini news logo
Home ठळक बातम्या मीरा-भाईंदर भाजपात नवी जबाबदारी : संतोष दीक्षित यांची उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्षपदी...

मीरा-भाईंदर भाजपात नवी जबाबदारी : संतोष दीक्षित यांची उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
75

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

मीरा-भाईंदर : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक फेरबदलांतर्गत संतोष दीक्षित यांची उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर त्यांनी सांगितले की पक्षाच्या विश्वासाला ते पात्र ठरतील आणि संघटना मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेतील.

दीक्षित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नरेंद्र मेहता आदींचे आभार मानले. तसेच कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून भाजप अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.

या नियुक्तीमुळे मीरा-भाईंदर भाजपात नवी उर्जा आणि उत्साह संचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here