
चिखली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – मंगळवार दि. ३०/०९/२०२५ रोजी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्री. नागेश्वर विद्यालय भागशाळा चिखली येथे भोंडल्याचे आयोजन करण्यात आहे. प्राचार्य सानप सर उपमुख्याध्यापिका सविता नाणेकर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
चित्रकला शिक्षक विश्वकर्मा चव्हाण यांनी फलकावर सुंदर हत्ती चित्र रेखाटन केले . शाळेच्या प्रशस्त क्रिडांगणावर मध्यभागी ठेवलेल्या हत्तीच्या प्रतिमेचे पर्यवेक्षिका शामला पंडित यांनी हार फुल वाहून पूजन केले . विद्यार्थ्यांनी फेर धरून टीपरीच्या तालावर भोंडला गीते सादर केली. अध्यापिका सुषमा शेवाळे, ज्योती घरबुडे, वृंदा क्षीरसागर, कविता बुरूड, वर्षा पाटील, दिपाली काळे, मनिषा सांडभोर , अध्यापक दिनेश बोरचटे,पवन खराडे, आबा वारघडे यांनी कार्यक्रम संयोजन व आयोजन केले. दत्तात्रय बुर्डे मामा, रमेश मामा यांनी माईक व्यवस्था पाहिली. भोंडल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खिरापत वाटण्यात आली.















