
चिखली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी स.10 वाजता पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, श्री नागेश्वर विद्यालय, मोशी. भागशाळा चिखली विद्यालयामध्ये शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा केंद्र क्रमांक 107171 चे उद्घाटन उत्साहामध्ये झाले . उद्घाटनाच्या वेळी केंद्रामध्ये परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली होती . परीक्षेसाठी आलेल्या सहभागी शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले . यावेळेस विद्यालयाचे प्राचार्य व चित्रकला परीक्षा केंद्रप्रमुख रामदास सानप सर उपमुख्याध्यापिका सविता नाणेकर मॅडम , पर्यवेक्षिका शामला पंडित मॅडम , कलाशिक्षक विश्वकर्मा चव्हाण सर व विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वागत केले . याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियम व महत्त्वाच्या सूचना दिल्या . आनंदी वातावरणात परीक्षा संपन्न झाल्या.















