
प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी – ऑल महाराष्ट्र सिलंबन असोसिएशनतर्फे पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या मुलींना लाठी-काठी व नॉन-चॅक यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच माता महाकाली महोत्सव रॅलीमध्येही मुलींना सहभागी करून उत्कृष्टरीत्या मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्याची दखल घेत श्री माता महाकाली महोत्सव 2025 ट्रस्ट तर्फे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते अध्यक्ष दुष्यंत नगराळे, महिला विंगच्या सचिव अंजली मेश्राम व हेमलता खोब्रागडे यांना सन्मानचिन्ह, ट्रॉफी व शाल प्रदान करून गौरविण्यात आले.












