
पद्माकर कांबळे वर्धा प्रतिनिधी – वर्धा सिद्धार्थ बुद्ध विहार टाकळी चना येथे वर्षावानिमित्त गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. बहुजन प्रबोधन कला मंच रात्रीचे गायक नारायण जारुडे, अरविंद राऊत, दिलीप म्हस्कर , रमेश मेंढे, यांनी गीत सादर केले. संचालन माणिक मून, तर आभार हंसराज पाटील यांनी मानले. यावेळी बुद्ध विहारांमध्ये बुद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.















