
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दि.०१ आक्टोंबर या जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी क्रियाशील व्यक्तिमत्व स्वरूपात जेष्ठ नागरिक सन्मान विविध ०४ गटात दिला जातो. त्या पुरस्कारात जेष्ठ नागरिक (दिव्यांग गट ) सन्मानासाठी चंद्रपूर येथील जेष्ठ नागरिक व दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेले ,माझे मार्गदर्शक,ज्यांना अनेक राज्यस्तरीय शासकीय व मानाकींत संस्थाचे पुरस्कार आजवर मीळालेले आहेत असे नेहमी हसत असणारे आदरणीय श्रीराम लक्ष्मण पान्हेकर यांना दि. ०५ ऑक्टोबर २०२५ ला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा सन्मान कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रियाताई सुळे, मा.नितीन पाटील (भा.प्र. से) विशेष आयुक्त वस्तू व सेवा कर महाराष्ट्र शासन,मा.हेमंत टकले कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सरचिटणीस यशवंतराव चव्हाण सेंटर व ईतर मान्यरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आजवर दिलेल्या सामाजिक,दिव्यांग व निरपेक्ष कार्याचा हा गौरव आहे.हा सन्मान मिळाल्याबद्दल श्रीराम पान्हेरकर यांचे सर्वच स्तरातुन सर्व राज्यभरातुन अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहे.















