prabodhini news logo
Home चंद्रपूर वृक्षारोपण व स्वच्छता स्पर्धा संपन्न

वृक्षारोपण व स्वच्छता स्पर्धा संपन्न

0
92

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत गुरु बहिणी वृक्षप्रेमी मंच तथा चंद्रपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने नेहरू विद्यालयात वृक्षारोपण व परिसर स्वच्छता करण्यात आली. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेऊन सर्व उपस्थितांना संवर्धना संदर्भात प्रतिज्ञा बदलून घेण्यात आली. नेहरू विद्यालयाच्या परिसरात विविध प्रजातीचे झाडे लावण्यात आले व शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानिमित्ताने उपस्थित महिला व मुलींनी वृक्ष जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. त्यात “वृक्षवल्ली आम्हा, सोयरे वनचरे” जहा हरियाली, वाहा खुशहाली” “पेड लगाओ फ्री ऑक्सिजन पाओ” “एक मूल, एक वृक्ष” “वसुंधरा हमारी माता है, जनम जनम का नाता है” इत्यादी नारे लावण्यात आले. असंख्य महिला प्रभात फेरीमध्ये सामील झाल्या सदर नाऱ्याने वार्डात वृक्षारोपण व स्वच्छता संबंधात जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला गुरु बहिणी वृक्षप्रेमी मंचाचे अध्यक्ष मनीषा भाके, योगिता धानेवार, प्रीती लख दिवे, वैशाली भागवत, सुनिता पूर्णये,शालिनी पिंपळ शेंडे, वर्षा इटणकर, मीनाक्षी आलोणे, संध्या मैंदळकर, अभिलाषा मैदळकर, ज्योती पेठकर, नंदा पेठकर, अर्चिता ऑस्कर, सुनिता शेंडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here