
चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या पुढाकारातून आयोजन
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : दलित समाजावर अन्याय, अत्याचार, हिंसेच्या घटनांत मागील काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. अशात आथा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार (ता. ८) दुपारी ४ वाजता चंद्रपुरात ‘आय लव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मार्चचे आयोजन करण्यात आले होते. गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मार्च काढण्यात आला.
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरून ‘आय लव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मार्चचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश अडूर यांच्या नेतृत्त्वात मार्च पार पडला. यावेळी गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मार्चला सुरवात झाली. यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, संविधनाने देश चालणार, अशा घोषणा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मार्चची सांगता झाली.
आंदोलनात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी,प्रदेश सरचिटणीस शिवा राव,महिला चंद्रपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चंदाताई वैरागडे, सुभाषसिंग गौर माजी नगरसेवक नंदू नागरकर,प्रवीण पडवेकर,बापू अंसारी,रुचीत दवे,सचिन कत्याल मनीष तिवारी,अड. प्रीती शाह, शालिनी भगत,अर्चना चीवंदे,साबिर सिद्दीकी, पप्पू सिद्दीकी, भालचंद्र दानव, पिंटू शिरवार,नौशाद शेख,काशिफ अली, शिरीष गोगुलवार, मोनू रामटेके, रोहित पिम्पलकर, राजेश वर्मा,प्रवीण अडूर, मनीष दास, प्रकाश देशभरतार,अजय चिनुरवर, स्वप्निल चिवंडे, विनीत डोंगरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.















