
वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सरन्यायाधीश गवई वरील हल्ल्याचा भारतीय काँग्रेस पक्ष, आजाद समाज पार्टी, भीम आर्मी, तथा रिपब्लिकन पक्षातर्फे निषेध करण्यात आला. आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2025 ला सायंकाळी 6 वाजता सर्वपक्षीय मिळून गौळ येतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हा अर्पण करून कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते तथा नेता गण कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होते . सर्वात प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या हार घालून गावातील प्रमुख रस्त्याने कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. यावेळी जोरदार घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोरेश्वरराव खोडके, आजाद समाज पार्टीचे वर्धा जिल्ह्याचे मीडिया प्रमुख पद्माकर कांबळे, रिपब्लिकन पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते वायगाव येथील विलास नगराळे व त्यांची टीम प्रामुख्याने कॅन्डल रॅलीमध्ये सहभागी होते. यावेळी मोरेश्वर राव खोडके यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्यावर वकिलाने वस्तू फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा कॅन्डल मार्च काढून तीव्र निषेध करण्यात आला आहे. यानंतर आजाद समाज पार्टीचे मीडियाप्रमुख पद्माकर कांबळे यांनी आपले विचार व्यक्त ते म्हणाले की या प्रकरणाला ब्राम्हणी मानसिकतेचा परमोच नमुना ठरले असून. ही घटना संविधान आणि सामाजिक न्यायावरचा आघात असल्याचे म्हटले.त्यांनी केंद्र सरकारच्या मनुवादी व हुकूमशाही वृत्तीवरही टीका केली आणि अशा प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.यानंतर रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते विलास नगराळे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला गौळ परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.












