prabodhini news logo
Home चंद्रपूर विशाल प्रबुद्ध जन संमेलनाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे

विशाल प्रबुद्ध जन संमेलनाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे

0
110

असे आव्हान आजाद समाज पार्टी (कांशीराम),विदर्भ सचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी केले.

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – घुग्घुस : चंद्रपूर महाराष्ट्र सामाजिक आणि राजकीय चळवळीला गतिमान करण्याकरता बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित नागपूर येथे “विशाल प्रबुद्ध जनसंमेलन नागपूर येथे 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त 14 ऑक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून आजाद समाज पार्टी (कांशीराम), च्या वतीने कार्यक्रमाचे स्थळ कविवर्य सुरेश भट सभागृह रेशमी बाग मैदान नागपूर येथे दुपारी 1 वाजता विशाल प्रबुद्ध जनसंमेलन चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ऍड. भाई चंद्रशेखर आझाद जी( आजाद समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष), तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये गौरी प्रसाद उपासक (माजी मंत्री, उत्तर प्रदेश सरकार व केंद्रीय प्रभारी महाराष्ट्र), मा. रुपेश बागेश्वर राज्य प्रभारी, मनीष साठे प्रदेशाध्यक्ष, डॉ. मानसी पवार उपाध्यक्ष, रुपचंद टोपले प्रदेश उपाध्यक्ष डॉ. जे बी. रामटेके प्रदेश महासचिव, व विदर्भ अध्यक्ष (पुर्व) नितीन नागदेवते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात राज्यभरातील पदाधिकारी ,कार्यकर्ते, आणि प्रबुद्ध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून सामाजिक न्याय, सविधान रक्षण, युवकाचे राजकीय सशक्तिकरण आणि बहुजन एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान सुरेश मल्हारी पाईकराव विदर्भ सचिव आजाद समाज पार्टी(कांशीराम), तसेच भावी नगराध्यक्षा घुग्घुस नगर परिषद चंद्रपूर जिल्हा महासचिव रिताताई फकरु देशकर यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here