prabodhini news logo
Home ठळक बातम्या मिरा-भाईंदर महानगरपालिकेला “हरित योगशाळा सन्मान–२०२५” पुरस्काराने गौरव

मिरा-भाईंदर महानगरपालिकेला “हरित योगशाळा सन्मान–२०२५” पुरस्काराने गौरव

0
128

IFAT इंडिया प्रदर्शनात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनातील उपक्रमांचे कौतुक

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
mojissports@gmail.com

मुंबई – १४ ऑक्टोबर २०२५:मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हरित आणि स्वच्छ शहराच्या दिशेने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना राष्ट्रीय पातळीवर मोठी दाद मिळाली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित IFAT इंडिया प्रदर्शनात “हरित योगशाळा सन्मान–२०२५” हा मानाचा पुरस्कार मिरा-भाईंदर महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात मा. खासदार श्रीकांत शिंदे आणि अभिनेत्री दीया मिर्झा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक मा. राजीवकुमार शर्मा (भा.प्र.से.) उपस्थित होते.

या प्रदर्शनात मिरा-भाईंदर महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकास यावरील अभिनव उपक्रम सादर केले. आकर्षक सादरीकरण व प्रभावी माहितीमुळे महानगरपालिकेचा स्टॉल विशेष ठरला.

मा. आयुक्त राजीवकुमार शर्मा म्हणाले :
“मिरा-भाईंदर महानगरपालिका हरित, स्वच्छ आणि हवामान-संवेदनशील शहर घडविण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील आहे. हा सन्मान नागरिकांच्या सहकार्याचा आणि सामूहिक यशाचा द्योतक आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here