prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूर येथील दिक्षाभूमी येथे 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बहुजन एम्प्लॉइज...

चंद्रपूर येथील दिक्षाभूमी येथे 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या स्टालचे थाटात उद्घाटन

0
126

प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी – डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांचा अंधार दूर करण्यासाठी,या देशातील वर्णव्यवस्थेने छळलेल्या वंचितांना मानवतावादी, समतावादी आणि विज्ञानाच्या कसोटीवर खरा उतरणारा तथागत गौतम बुद्धांच्या प्रकाशाचा मार्ग दाखविला.नागपूर नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो जनतेला 16 आक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली.या ऐतिहासिक दिनानिमित्त बुधवारी दिनांक 15 आक्टोबर 2025 ला चंद्रपूर येथील पवित्र दिक्षा भूमी परिसरात 69 व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या ट्रेड युनियनच्या स्टाईलचे उद्घाटन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या हस्ते आणि बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटन सचिव प्रा.डॉ.टी.डी.कोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाले.या प्रसंगी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे मुखपत्र*बीईएफ समाचार* या पाक्षिकाच्या धम्म चक्र प्रवर्तनदिन विशेषांक 2025 च्या वितरणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.या बीईएफच्या स्टालच्या उद्घाटनाची सुरूवात तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक स्मृतीशेष श्रीकृष्ण उबाळे साहेब यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आणि बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.या उद्घाटन समारंभाला बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय खोब्रागडे, जिल्ह्याचे सचिव आशिष गेडाम, चंद्रपूर शहर अध्यक्ष दीपक जुमडे, शहर सचिव दिलीप परकारे,शहर उपाध्यक्ष अनिल नांदेकर,शहर सहसचिव दौलत जांभूळे, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यकारिणी सदस्य बबन तोडासे,सोनू वनकर, विनोद गवळी, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्नित चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र अंतर्गत बहुजन विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटनेचे शाखा अध्यक्ष नितीन वाढई इत्यादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यकारिणी सदस्य अमर दुधे यांनी तर आभारप्रदर्शन शहर उपाध्यक्ष अनिल नांदेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here