
उल्हासनगर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 16 ऑक्टोबर:
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी दि.12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्लीत आंदोलन कारण्यात येणार आहे अशी घोषणा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रेणेते भन्ते विनाचार्य यांनी तक्षशीला विद्यालय उल्हासनगर न. 4 येथे भिक्कू संघाच्या वतीने आयोजित केलेल्या बौद्ध संघर्ष सभेत केली. अध्यक्षस्थानी भिक्कू संघनायक डॉ आनंद महाथेरो होते.
भन्ते विनाचार्य म्हणाले की, 134 वर्षांपासून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी लढा सुरु आहे.भन्ते अनागरिक धम्मपाल हे श्रीलंके मधून भारतात आले त्यांनी महाबोधी महाविहारात हिंदू धर्माच्या जुन्या रूढी प्रथा राबविण्यात येत असल्याचे पाहिले, त्यांनी या अंधश्रद्धा प्रथेला विरोध केला आणि महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात असावे या साठी लढा सुरु केला तो लढा आज आम्ही पुढे सुरु ठेवला आहे.

हिंदुची मंदिरे शिर्डी साई मंदिर, बालाजी तिरुपती यांना जेवढे दान मिळते त्यापेक्षाही जास्त दान 56 बौद्ध देशामार्फत बुद्धगया महविहाराला मिळते आहे परंतु त्या ठिकाणी भंतेना भोजनदान सुद्धा मिळत नाही असे ही भन्ते विनाचार्य म्हणाले.बुद्धगया महाबोधी विहार हे भगवान बुद्धांच्या संबोधिने प्रसिद्ध आहे. हे महाविहार बौद्धाच्या ताब्यात असावे या मागणीसाठी, 134 वर्षाच्या आंदोलनाला मूर्त स्वरूप येईल या करिता एक वेळ दिल्लीला चला. दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्लीला चला असे आवाहन भन्ते विनाचार्य यांनी बौद्ध जनतेला केले.
भन्ते डॉ आंनद महाथेरो म्हणाले की, मी 19 वर्षाचा असतांना श्रीलंके वरून भारतात आलो. 1969 साली उल्हासनगरला आलो. धम्मकार्या सोबत शैक्षणिक कार्य सुरु केले. तक्षशीला विद्यालय सुरु केले. आज तक्षशीला विद्यालयात 3500 विधार्थी शिकत आहेत या विद्यार्थ्यान पैकी काही डेप्युटी कलेक्टर झाले आहेत.आम्ही भिक्कू संघाने आंदोलनकर्ते भन्ते विनाचार्य यांना पाठिंबा दिला आहे. मला विश्वास आहे एक ना एक दिवस महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात मिळेल.

या प्रसंगी भन्ते राहुल बोधी म्हणाले की, संघर्षाची सुरवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. आमचा शत्रू नेमका कोण आहे हेच आम्हाला समजत नाही. आमचा लढा हा मनुवाद्यांची आहे. भन्ते धम्मदर्शी म्हणाले की, भिक्कू संघात शांती असते तशी त्यांच्यात क्रांती ही असते. भन्ते सुगतांनंद थेरो म्हणाले की, सतधम्म हा फक्त भारतातच दिसतो आहे. भन्ते दिपणकर यांनी प्रास्तविक केले. बौद्ध जनतेच्या वतीने 50 हजार रुपयाचा चेक भन्ते डॉ आनंद महाथेरो यांच्या हस्ते भन्ते विनाचार्य यांना सुपूर्त करण्यात आला.
बौद्ध संघर्ष सभेला बौद्ध नेते आमदार डॉ बालाजी किणीकर, सुरेश सावंत, सारंग थोरात, आय एम मोरे, किरण सोनावणे, राहुल हंडोरे, तसेच विविध संस्था संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. बौद्ध संघर्ष सभेला उपासक उपासिका यांनी प्रचंड गर्दी केले होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेखा पैठणे यांनी केले.















