
प्रेरणा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – गडचांदूर: बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेत जिद्द, चिकाटी आणि ध्येर्याने अभ्यासात सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत यशप्राप्ती होते, त्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन विजय विजय अकॅडमी चंद्रपूरचे मार्गदर्शक निखिलजी धोडरे यांनी केले. ते युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था संचालित कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्नित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्याने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते. कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी प्रा. प्रवीण आंबटकर होते. प्रा. ईजाज शेख,प्रा. दुर्गावती खुबाळकर, प्रा .अंजना पवार, प्रा पल्लवी कदम, प्रा. धोटे , कुंजन शेंडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने मार्गदर्शक निखिल धोडरे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी योग्य करिअर कसे निवडावे, आवडी आणि क्षमता ओळखून निर्णय कसे घ्यावे, याविषयी मार्गदर्शन निखिल धोडरे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करत विविध प्रश्नोत्तर माध्यमातून मार्गदर्शन केले. इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था ,चालू घडामोडी इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयावर सखोल मार्गदर्शन मार्गदर्शक माननीय निखिल धोडरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा .दुर्गाबाई खुबाळकर यांनी तर प्रस्ताविक प्रा.इजाज शेख यांनी आभार तन्वी चहाकाटे हिने मानले.















